Peoples Media Pune header

Go Back

डॉ.मिलिंद भोसुरे यांना “महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार” प्रदान.

20 Feb 2020

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,मानवसेवा विकास फाउंडेशन,या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती महोत्सव पुणे श्रमिक पत्रकार भवन यथे संपन्न झाला.त्यांच्या वतीने स्वरूप संप्रदायाचे गुरुवर्य डॉ.मिलिंद भोसुरे यांना त्यांनी केलेल्या कार्याच्या गौरवार्थ “महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार २०२०”देवेन्द्रजी भूजबळ यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.भव्य सन्मानचिन्ह,अभिलेख मानपत्र,राजमुद्रा पदक,कार्याची माहिती संकलित केलेला विशेषांक,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी उद्घाटक तृप्ती देसाई,देवेन्द्र भूजबळ,अनुजा देशपांडे,सौ.स्वाती भोसुरे आदि मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.डॉ.मिलिंद भोसुरे यांचे “स्वरूप तत्वज्ञान”हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.

छायाचित्र :डावीकडून स्वाती भोसुरे,मिलिंद भोसुरे,तृप्ती देसाई,देवेन्द्र भूजबळ. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite