Peoples Media Pune header

Go Back

“कायद्याने स्रीभ्रूण हत्या थांबणार नाही तर डॉक्टर व महिलांनी नातेवाईकांनीच लिंग निदान चाचणीस नकार दिल्यास या हत्या थांबतील”,डॉ.राजेंद्र फडके.

23 Feb 2020

 “नुसता कायदा केल्याने स्रीभ्रूण हत्या थांबणार नाही तर डॉक्टर्स,महिला व नातेवाईक यांनीच लिंग निदान चाचणीस नकार दिला पाहिजे.आदिवासी व मुस्लिम यांच्यात स्रि-पुरुष जन्मदर रेषो चांगला आहे.पुणे जिल्ह्यात कमी आहे.यासाठी जनजागृती हवी’.असे प्रतिपादन बेटी बचाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी केले.रोटरी क्लब पुणे कर्वेनगर,नॅशनल मेडिकोज असोसिएशन,डेक्कन एज्युकेशन सोसायटी,व जनमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आदिशक्ति” या महिला सबलीकरण कार्यक्रमात बोलत होते.फर्ग्युसन कॉलेजच्या अॅम्फी थिएटर येथे झालेल्या.या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब कर्वेंनगरच्या अध्यक्ष आशा आमोणकर,डॉशरद आगरखेडकर,स्वाति जोगळेकर,डॉ.सुधा चौधरी,डॉ.अनघा लवळेकर,अभिनेत्री भाग्यश्री देसाई आदी मान्यवरांच्या बरोबच विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणार्‍या महिलांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करणात आला.महिला सबलीकरण,स्रीभ्रूण हत्या,इत्यादी विषयांवर मान्यवरांनी आपली मते मंडली.

छायाचित्र :मान्यवर व सत्कारार्थी यांचे समूहचित्र. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite