Peoples Media Pune header

Go Back

अभिनव कला महाविद्यालयाच्या चित्र प्रदर्शनास सुरुवात.

25 Feb 2020

भारतीय कला प्रसारिणी सभेकडून चालविल्या जाणार्‍या अभिनव कला महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या चित्रप्रदर्शनास आज राजा रवि वर्मा कलादालन घोले रस्ता येथे सुरुवात झाली.प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते झाले,कार्यक्रम न्यासाचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.आयुक्तांकडून चित्रप्रदर्शनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना न्यासाचे दिवंगत सचिव बीएम पाठक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणार्‍या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे मनापासून कौतुक केले.आणि म्हणाले की माझ्या रोजच्या कामातून मला विद्यार्थ्यांच्या कलेमध्ये रमायला मिळाल याच मला समाधान आहे.न्यासाचे सचिव पुष्कराज पाठक स्वागतपर भाषणात म्हणाले की,कमी शब्दात आणि कमीत कमी वेळेत ग्राहकांपर्यंत जाहिरातीच्या माध्यमातून पोहोचण्याचे काम विद्यार्थ्यांच्या कलेच्या माध्यमातून होत असते.विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.उपायुक्त माधव जगताप त्यांच्या मनोगतामध्ये म्हणाले की आतापर्यन्त न्यासाचे सचिव पुष्कराज पाठक यांच्यामुळे महापालिकेला खूप मदत झाली आहे.यापुढे देखील महापालिकेस गरज असेल तेव्हा आपण आम्हास मदत करा.कार्यक्रमास प्राचार्य राहुल बळवंत,विभाग प्रमुख राहुल बोरावके,व तानाजी भंडारे,विद्यार्थी प्रतिंनिधी सुशील भिसे,व रिद्धी मायनेकर,मोठ्या संखेने विद्यार्थी व सर्व अध्यापक उपस्थित होते.प्राचार्य राहुल बळवंत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.हे चित्रप्रदर्शन 25/26/27 तारखे पर्यन्त 10.00 ते 7.00 राजा रवि वर्मा आर्ट गॅलेरी घोलेरोड येथे सर्वांसाठी विनामुल्य खुले आहे.

छायाचित्र :महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड व सचिव पुष्कराज पाठक यांच्या समवेत इतर मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite