Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब फिनिक्सच्यावतीने हीरे हायस्कूल मध्ये “इंटरॅक्ट”क्लबची स्थापना.

25 Feb 2020

रोटरी क्लब फिनिक्सच्यावतीने सहकारनगर येथील राजर्षि शाहू महाविद्यालय परिसरातील हीरे हायस्कूल येथे “इंटरॅक्ट”(बाल रोटरी क्लब)ची स्थापना करण्यात आली.या प्रसंगी रोटरी क्लब फिनिक्सच्या अध्यक्ष रो.मानसी खुर्जेकर,रो.दिनकर पळसकर(प्रांत अधिकारी),रो.स्वप्नील देशपांडे(युथ डायरेक्टर),रो.विकास टोपले,प्रदीप डांगे,संजय देव,ममता कोल्हटकर,विनय कुमठेकर,संयोजिता पागे,संजय भैलूमे(मुख्याध्यापक) आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमात “इंटरॅक्ट”क्लब च्या अध्यक्षपदीकु.सुधांशी खंडागळे ८ वी,कु.निशा वाल्मिकी(सेक्रेटरी)८वी,विनोद सोलंकी(खजिनदार)९वी.यांची निवड व पदग्रहण करण्यात आले.या प्रसंगी बोलतांना रो.दिनकर पळसकर यांनी या कलबच्या माध्यमातून हे विद्यार्थी जागतिक संघटनेत जोडले गेले असून यातून त्यांच्या व्यक्तिमत्व विकास घडेल असे संगितले.मानसी खुर्जेकर यांनी या क्लबच्या विविध कार्यक्रमात सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल असे संगितले.मुख्याध्यापक संजय भैलूमे यांनी अशाप्रकारे पहिल्यांदाच उपक्रम होत असून आगामी काळात याचा विस्तार करण्यात येईल असे.संगितले.    

छायाचित्र :“इंटरॅक्ट”क्लब मान्यतापत्र देतांना,मानसी खुर्जेकर व दिनकर पळसकर.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite