Peoples Media Pune header

Go Back

आर्थिकदृष्टया दुर्बल कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी रोटरी गणेशखिंडचा “परदा है परदा”कार्यक्रम.

27 Feb 2020

रोटरी क्लब ऑफ पुणे गणेशखिंड कडून शनिवार दिनांक ७ मार्च २०२० रोजी “आर्थिकदृष्टया दुर्बल कॅन्सरग्रस्त’रूग्णांच्या सर्जरी-मदतीसाठी एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.गझल,कव्वाली,व सूफी गीतांचा या कार्यक्रमात समावेश असेल.फिल्मी व गैरफिल्मी अशी ही गीते असतील.हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड येथे सायंकाळी ५ वाजता संपन्न होईल.सामाजिक जाणिवेच्या बांधीलकीतून रोटरी क्लब गणेश खिंड विविध उपक्रम राबविते.पैशाआभावी अनेकांना कर्करोगाचे महागडे उपचार परवडत नाहीत.व प्रसंगी प्रियजनांचा वियोग सहन करावा लागतो.अशांना मदत म्हणून गणेशखिंड क्लबने आर्थिक निधी उपलब्ध करण्याकरिता “परदा है परदा”या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पुण्यातील नामांकित संगीतकार वाद्यवृंद,व गायक यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे.कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रसिद्ध हार्मोनियम वादक सचिन जांभेकर करणार आहेत॰कार्यक्रमाची संकल्पना ही वेगळीच आहे. “परदा है परदा”च्या पूर्वीच्या कार्यक्रमांला ही श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे.या ही कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रोत्यांनी या वेगळ्या संकल्पनेचा आनंद घ्यावा व एक सामाजिक बांधिलकी जपण्याचे समाधान मिळवावे असे आवाहन रो.सुनीता पारसनीस-अध्यक्ष रोटरी क्लब गणेशखिंड.माजी अध्यक्ष रो.सुरेन्द्र पारसनीस,रो.स्नेहल भट,रो.सुप्रिया काळे यांनी पत्रकार परिषदेत केले.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite