Peoples Media Pune header

Go Back

शिवसेना पुणे महिला आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

27 Jun 2020

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले होते.त्याला प्रतिसाद म्हणून शिवसेना पुणे महिला आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन,स्वारगेट येथे झालेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापति आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले.या शिबिराचे आयोजन सविता मते शहर संघटिका पुणे शहर शिवसेना महिला आघाडी.व सांगिता ठोसर नगरसेविका यांनी केले होते.उपनेते रवींद्र मिर्लेकर,जिल्हा प्रमुख बाळाभाऊ कदम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी मा.आ.चंद्र्कांत मोकाटे,महादेव बाबर,तृष्णा विश्वासराव,नगरसेविका पल्लवी जावळे,निर्मला केंडे,राधिका हरीचंद्रे,सुदर्शना त्रिगुणाईत,सविता मते,स्वाति कथलकर,सरोज कर्वेकर,श्रुति नाझीरकर,कल्पना थोरवे,नेहा कुलकर्णी,प्रज्ञा लोणकर,पद्मा सोरटे,कविता अम्रे,संजय मोरे(शिवसेना शहर प्रमुख),सूरज लोखंडे,अक्षय रक्तपेढीने शिबिराचे तांत्रिक संचालन केले.शिबिरात स्रि व पुरुष मिळून १५१ जणांनी रक्तदान केले.या प्रसंगी बोलताना महिलांनी केलेले रक्तदान शिबीर हा बहुदा पहिलाच अनोखा उपक्रम असावा असे सांगून या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite