Peoples Media Pune header

Go Back

स्वरूप संप्रदाय गुरुपोर्णिमा उत्सव.

07 Jul 2020

स्वरूप संप्रदाया तर्फे दरवर्षी साजरा होणारा गुरुपोर्णिमा कार्यक्रम या वर्षी झुम व फेसबूक लाईव्हच्या माध्यमाने दाखविण्यात आला. यावेळी स्वरूप संप्रदायाचे गुरुवर्य सत्पुरुष डॉ.मिलिंद महाराज भोसुरे यांनी प्रवचन केले.सर्व भक्तगण व शिष्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.आपले जीवन दीर्घायु बनून दिव्य बनावे,जीवन दिव्य बनणे म्हणजे जीव देव बनणे होय,आत्मज्ञानाने मनुष्यास दिव्यता अर्थात संतत्व व देवत्व प्राप्त होते.व असे जीवन सफल व धन्य असते. असा मनुष्य नराचा नारायण बनतो.मनुष्य किती दिवस जगला त्यापेक्षा तो कसा जगला याला जास्त महत्व आहे.जीव दिव्य अर्थात देव बनला की जीव अद्वैतात जातो,अद्वैत हे आनंदास तर द्वैत दु:खास करणीभूत असते.

     अशा दिव्यात्वाची खाण असलेल्या स्वरूप संप्रदायाचे ज्ञान घेवून दिव्यत्वाची प्रचिती घेवून जीवनाचे सोने करावे असे आवाहन केले.यावेळेस दाखला देताना कवी बा.भ.बोरकर यांचे वाक्य संगितले “दिव्यत्वाची जेथ प्रचिती,तेथे कर माझे जुळती”I 

छायाचित्र : प्रवचन करताना गुरुवर्य सत्पुरुष डॉ.मिलिंद महाराज भोसुरे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite