Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब सहवासच्या अध्यक्षपदी रो.किरण इंगळे.

18 Jul 2020

रोटरी क्लब ऑफ सहवासच्या अध्यक्षपदी रो.किरण इंगळे यांची निवड करण्यात आली.त्यांनी मावळते अध्यक्ष रो.चंद्रकांत कुलकर्णी यांच्या कडून सूत्रे स्वीकारली. हा पदग्रहण समारंभ काल डिजिटल माध्यमातून संपन्न झाला.या समारंभास प्रमुख पाहुण्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी.उपस्थित होत्या.सेक्रेटरीपदी रो.प्रकाश अवचट व अन्य संचालकांची नेमणूक झाली.डिजिटल माध्यमातून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुमारे १०० जण उपस्थित होते.नवनियुक्त अध्यक्ष किरण इंगळे यांनी यावर्षी प्रांत ३१३१ मधील २ लाख डॉलर्सच वॉटर शेड प्रकल्प,२०००० मोतीबिंदू शस्त्रक्रिया,महिला सबलीकरणा साठी ११ महिलांना गॅलॅक्सी ड्रायव्हिंग स्कूल मधून शास्रोक्त प्रशिक्षण देवून स्वतंत्र व्यवसायास मार्गदर्शन ,रक्तदान शिबीर,तरुणांना रोजगार मार्गदर्शन शिबीर व अन्य समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे सांगिले.

छायाचित्र :रो किरण इंगळे

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite