Peoples Media Pune header

Go Back

“केंद्र व राज्य सरकारांनी आगामी काही वर्ष फक्त पायाभूत सुविधा,शिक्षण,आरोग्य यावरच लक्ष केन्द्रित करावे.”-.श्री अच्युत गोडबोले.

25 Jul 2020

केंद्र व राज्य सरकारांनी आगामी काही वर्ष फक्त शिक्षण,पायाभूत सुविधा,आरोग्य यावरच लक्ष केन्द्रित करावे असे प्रतिपादन संगणक तज्ञ,लेखक व विचारवंत.अच्युत गोडबोले यांनी केले.रोटरी क्लब ऑफ लोकमान्य नगर  व राईज संस्था आयोजित “भारताची अर्थस्थिती :कोरोना पूर्वी आणि नंतरच्या नंतरच्या दिशा” या विषयावर आयोजित ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते.यात झुम व फेसबुक वर मिळून १७ क्लब मधील ५०० पेक्षा अधिक व्यक्तींनी  सहभाग घेतला.संयोजन रोटरी क्लब ऑफ लोकमान्यनगरचे अध्यक्ष रो.अॅड आनंद माहूरकर,सेक्रेटरी रो.अविनाश तरवडे यांनी केले.यावेळी क्लब सदस्यांनी श्री.गोडबोले यांना मानपत्र प्रदान केले व क्लबचे मानद सदस्यत्व बहाल केले.त्याचा गोडबोले यांनी सहर्ष स्वीकार केला. शेवटी सदस्यांच्या शंकांना गोडबोले यांनी उत्तरे दिली.   

छायाचित्र :श्री.अच्युत गोडबोले मार्गदर्शन करताना 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite