Peoples Media Pune header

Go Back

कारगिल दिनानिमित्त रोटरीच्या वतीने माजी सैनिकांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान

26 Jul 2020

आज कारगिल विजय दिन.यानिमित्त रोटरीक्लब प्रभातच्या वतीने कर्नल राहुल बाली(सीईओ क्युएमटी आय-रेंजहिल) यांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार,तर सुभेदार एन.डी.कलाने(ट्रेनिंग सुपरवाझर) यांना सेवा गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.शाल,श्रीफल,गुलाबपुष्प,आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. कारगिल हॉल रेंजहिल येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब प्रभातचे अध्यक्ष रो.देवदत्त आपटे,सेक्रेटरी सुनील जुन्नरकर,सेवा प्रकल्प डायरेक्टर उमेश पालवनकर,पराग आपटे,रवींद्र देशपांडे आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना कर्नल राहुल बाली यांनी सैनिक नोकरी म्हणून कधीच सैन्यात येत नाही तर देशसेवा म्हणून येतात.असे सांगितले.रोटरी प्रभातचे अध्यक्ष देवदत्त आपटे येणी आगामी काळात या संस्थेशी संलग्न राहून विविध सेवा प्रकल्प राबविण्याचा मनोदय व्यक्त  केला.

छायाचित्र :डावीकडून सुनील जुन्नरकर,राहुल बाली,देवदत्त आपटे,एन.डी.कलाने,रवींद्र देशपांडे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite