Peoples Media Pune header

Go Back

नृत्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले यांची निवड.

28 Jul 2020

नृत्य परिषद महाराष्ट्र या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२६ जुलै २० रोजी पार पडली.त्यामध्ये श्री. मेघराज राजे भोसले यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच २०२०-२०२१ करिता नूतन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली आहे.राज्यभर विखुरलेल्या लोकनृत्य,शास्त्रीय तसेच वेस्टर्न नृत्य कलावंतांना एकत्रित करण्याच्या हेतूने संस्था कार्यरत आहे.शहरात नवे नृत्यगृह,नृत्याच्या पुस्तकांची लायब्ररी,मोठ्या कलावंतांचे मार्गदर्शन वेस्टर्न आणि महाराष्ट्राच्या लोककलांचा आभ्यासक्रम अशा विविध विषयांना उद्दिष्ट ठेवून संस्था काम करीत आहे.अध्यक्षपदाचे पत्र देवून श्री मेघराज राजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी संस्थेचे रत्नाकर शेळके,कुणाल फडके,राहुल साठे आणि जतिन पांडे उपस्थित होते.  

छायाचित्र :मेघराज राजे भोसले यांचा पत्र देवून सत्कार करताना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite