Peoples Media Pune header

Go Back

मंदिरे सुरू करण्याची स्वरूप संप्रदायाची मागणी.

01 Aug 2020

मंदिर दर्शन आता सोशल डिस्टन्सिंग व इतर नियम पाळून चालू करणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य सरकार यांनी याबाबत लवकर निर्णय घ्यावा.यामुळेच परमेश्वर कृपेने कोरोंना निश्चितच हद्दपार होईल असे प्रतिपादन स्वरूप संप्रदायाचे गुरुवर्य डॉ.मिलिंद भोसुरे यांनी केले.सध्याची परिस्थिति पाहता लोकांचा आत्मविश्वास खचलेला आहे व तो जागृत करून उभारी मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणजे देवावरील श्रद्धा.श्रद्धेतूनच हृदयामध्ये प्रेम,जिज्ञासा,हिमत धडाडी,धौर्य,रोमांच,सुस्थिरता,अक्षोभ,उद्यम इ.सद्गुणांची प्राप्ती होते.आजवर इतर गोष्टींची जशी आवश्यकता आहे तशीच भगवंता प्रति दर्शन करण्याची तळमळ सर्व सामाजाची आहे.तरी मंदिरे खुली केल्यास सर्व भक्तगण सर्व नियमांचे पालन करून लाभ घेतील.व त्यातून स्वत:च स्वत:चा आत्मविश्वास वाढवतीलव कोरोनावर मत करतील.दर्शनाने कार्यक्षमता वाढेल,स्वभाव बदलेल,मन:शांतीमिळेल,शरीराचे व मनाचे आरोग्य सुधारेल.आपण सर्वांनी संकल्प करू या की आम्ही निश्चितच कोरोना वर मात करू.भगवंताकडे प्रार्थना करून त्याच्या आशीर्वादाने हे सहज शक्य आहे तरी मंदिरे दर्शनासाठी खुली करावी.ही नम्र विनंती करतो स्वरूप संप्रदाय.

छायाचित्र :डॉ.गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद महाराज. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite