Peoples Media Pune header

Go Back

बंदी उठविण्याची पुणे जिल्हा साऊंड सिस्टिम असोसिएशनची मागणी.

10 Aug 2020

कोरोनाने संपूर्ण देशात आणि राज्यात धुमाकूळ घातला आहे.त्यामुळे गेले चार महिन्यापासून सगळीकडे लॉकडाउन सुरू आहे.त्यामुए या लॉकडाउनचा आर्थिक फटका व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.लॉकडाउन काळात उत्सव,लग्न यांचा सीझन होता,परंतु सरकारने सर्व धार्मिक काम,सण,लग्नकार्य यावर बंदी असल्याने सीझन असूनही साऊंड सिस्टिम धंदा बंद होता.यामुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्याकरिता सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यावे,त्यासाठी पुण्यात आज पुणे जिल्हा साऊंड सिस्टिम असोसिएशनने पत्रकार परिषद घेतली.कोरोना काळा मध्ये साऊंड सिस्टिमचा धंदा गेली चार महीने बंद आहे,त्यामुळे घरदार उपाशी रहाण्याची वेळ आलेली आहे.सरकारने निर्बंध घातले आहेत मात्र आम्ही काम केले नाही तर आमचे घर कसे चालणार,पोट कसे भरणार ?सरकार बाकी व्यवसायांवर बंदी उठवू शकतो मग आमच्याकडे लक्ष का देत नाही,पुढील काळात गणपती,नवरात्र आले आहेत त्याकरिता सरकार त्यावरील असलेले निर्बंध मागे घेणार का ?असे प्रश्न या परिषदेत व्यावसायिकानी मांडले आहेत.या प्रसंगी संस्थापक अध्यक्षछावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र करनभाऊ गायकर,पुणे जिल्हा अध्यक्ष पुणे जिल्हा साऊंड सिस्टिम असोसिएशन गणेश काळभोर,उपजिल्हाध्यक्ष अनिल पाटील,सचिव अमोद आमले.आदी मान्यवर उपस्थित होते.  

छायाचित्र :पत्रकार परिषदेत संबोधन करताना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite