Peoples Media Pune header

Go Back

स्वातंत्र्यदिनी गरजू नृत्य कलाकारांना किटचे वाटप.

20 Aug 2020

नृत्य परिषद महाराष्ट्र संस्थेच्यावतीने पुणे शहरातील गरजू नृत्य कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप खासदार गिरीषजी बापट व संस्थेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.लॉकडाऊनच्या काळात कलावंतांवर ओढवलेल्या संकटसमयी मदत करण्याच्या उद्देशाने कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रांगणात करण्यात आला.खासदार गिरीषजी बापट यांनी कलावंतांच्या पाठीशी घट्ट उभे रहाण्याचे आश्वासन दिले आणि त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवू असे प्रतिपादन केले.मेघराज राजे भोसले यांनी कलाकारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून शासनाने वृद्ध तसेच गरजू कलाकारांची तातडीने दखल घ्यावी अशी विनंती आपल्या मनोगतामध्ये केली.पुण्यातील १३५ नृत्य कलाकारांना या प्रसंगी किट तसेच चहापान देवून कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे आयोजन नृत्य परिषदेच्यावतीने जतिन पांडे,रत्नाकर शेळके,आशुतोष राठोड,दिपक रणदिवे,आणि सदस्यांनी केले.या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुधीर जवळेकर आणि मंदार घुले उपस्थित होते त्यांचा सन्मान करण्यात आला. 

छायाचित्र :किट वाटप करताना गिरीष बापट,मेघराज राजे भोसले,जतिन पांडे.व अन्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite