Peoples Media Pune header

Go Back

पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या वतीने तालमींना प्रथमोपचार किट प्रदान.

23 Aug 2020

पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य पुणे शहर वैद्यकीय सल्लागार अध्यक्ष पै.उमेश गायकवाड यांच्या वतीने १० तालमींना प्रथमोपचार किट प्रदान करण्यात आले.तालमीतील जी मुले सराव करतात त्या दरम्यान त्यांना किरकोळ दुखापती होतात.त्यासाठी याचा उपयोग होईल.पै उमेश गायकवाड हे स्वत: उत्कृष्ठ पहिलवान होते.खालकर तालिम व मामसाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज येथे सराव करीत होते सध्या ते म्हराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पा चरणी सेवा करतात.त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत सर्व तालीम क्षेत्रातील दिग्गजांनी केले आहे.”डोपिंग मुक्त महाराष्ट्र”हे पैलवान ग्रुपचे उद्दिष्ठ असल्याचे त्यांनी नमूद केले.

छायाचित्र :किट प्रदान करताना पै.उमेश गायकवाड. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite