Peoples Media Pune header

Go Back

बढाई समाज ट्रस्टच्या वतीने २००० मास्क वाटप.

26 Aug 2020

१८९३ साली स्थापन झालेला पहिला समाज गणपती,पुणे बढाई समाज ट्रस्ट गणेशाची प्राणप्रतिष्ठा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना २००० मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.कोरोनाच्या काळात ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा केली असे खरे कोरोना योद्धा फरासखाना पोलिस स्टेशांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर,व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक पुणे म.न.पा संतोष कदम यांच्या हस्ते संपन्न झाला.या प्रसंगी बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई,किशोर रजपूत,स्वप्नील नाईक,प्रशांत बढाई,दिनेश बढाई,भाऊ करपे,रफिक रंगरेज,अतुल बढाई,तन्वीर रंगरेज,पुणे म,न.पा चे कर्मचारी व पोलिस कर्मचारी,आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :कार्यक्रम प्रसंगी मान्यवर.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite