Peoples Media Pune header

Go Back

राजपूत सोशल वॉरियर्सच्या वतीने समस्त राजपूत समजतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

02 Sep 2020

राजपूत सोशल वॉरियर्सच्या वतीने समस्त राजपूत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देवून यथोचित सन्मान करण्यात आला,यावेळी प्रथम बढाई समजाच्या गणेशाची महाआरती करण्यात आली.व नंतर कार्यक्रमास सुरुवात झाली.राजपूत ऐक्याच्या विचाराचे आधारस्थंभ राजनशेठ काची,अॅड प्रतापभैय्या परदेशी,डॉ.मिलिंद भोई,वैशाली परदेशी,प्रमोद राणा,कविराज संघेलिया,रवी परदेशी इत्यादि मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांप्रती  कौतुकपर भाषणे झाली.सर्व मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पॅड,पेनसेट,गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजपूत सोशल वॉरियरचे प्रांत सरचिटणीस शैलेश बढाई यांनी तर आभार प्रांत कार्याध्यक्ष स्वप्नील नाईक यांनी मानले.या कार्यक्रम प्रसंगी प्रशांत बढाई,धनश्याम बढाई,दिनेश बढाई,आशिष चौधरी,नवीन लोधी,विशाल लोधी,आनंद परदेशी,बाबू परदेशी,अरविन्द परदेशी,नितिन रजपूत,प्रेमभैय्या राठोड,शरद राठोड,जयसिंग रजपूत,निर्मलामावशी रजपूत,यांसह अनेक महिला क्षत्राणीया उपस्थित होत्या.रजपूत सोशल वॉरियर्सचे संस्थापक अध्यक्ष किशोर राजपूत यांचे अध्यक्षीय भाषण होवून कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

छायाचित्र :विद्यार्थ्यांच सत्कार करताना मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite