Peoples Media Pune header

Go Back

प्रभारी कला संचालकांच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून ऑनलाइन आंदोलन.

03 Sep 2020

महाराष्ट्र राज्य कला संचनालयाचे कला संचालक म्हणजे त्या कला संचालकाला कलेबद्दल आस्था व प्रेम असणे गरजेचे आहे व तो त्याच क्षेत्रातील अनुभवी व्यक्ति असणे हे गरजेचे आहे.त्यामुळे प्रभारी ऐवजी महाराष्ट्रातील कला जोपासण्यासाठी एक पूर्णवेळ कला संचालक मिळणे अत्यंत महत्वाचे आहे.त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील संपूर्ण कला महाविद्यालयातील सर्व कर्मचारी-प्राचार्य फेडरेशन यांनी एकजुटीने कायमस्वरूपी संचालक मिळावा यासाठी काळे फिती लावून निषेध व्यक्त केला.कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व कला महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज सध्या बंद आहे.या पार्श्वभूमीवर आपली कला महाविद्यालये देखील सुरू करावीत म्हणून महाकॅटना,फेडरेशन आणि कला महाविद्यालय संघ प्रयत्नशील आहे.या गंभीर समस्येवर तत्काळ निर्णय व्हावा म्हणून तीनही संघटनांच्या मध्ये समन्वय साधून कला महाविद्यालयांच्या विविध प्रश्नांबाबत संवाद साधण्याचे काम सुरू आहे.यावेळी महाकॅटनाच्या पदाधिकार्‍याला प्रभारी कलासंचालक राजीव मिश्रा यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे.त्याचवेळी त्यांनी महाकॅटनालाही शिवीगाळ केली.याबाबतची तक्रार तीनही संघटनांच्यावतीने मा,उदय सामंत (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री)यांचेकडे केली आहे. संघटनेला किंवा संघटनेच्या पदाधिकार्‍याला अशा पद्धतीने धमकावणे,शिवीगाळ करणे हे कला संचालक पदाला शोभणारे नाही,त्यामुळे सदर प्रकरणी विद्यमान  प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी संघटनेची माफी मागून राजीनामा द्यावा अशी सर्वांची आग्रही मागणी आहे.राजीव मिश्रा जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही महाविद्यालयात काळया फिती लावून निषेध व्यक्त करणार आहोत.यानिमित्ताने आपली एकजूट आणि ताकद दाखविण्यासाठी या निषेध अभियानात महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये व अभिनव कला महाविद्यालयातील प्राचार्य,विभाग प्रमुख,सर्व प्राध्यापक,कर्मचारी सहभागी झाले.    

 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite