Peoples Media Pune header

Go Back

रोटरी फोरच्यूनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न.

08 Sep 2020

कोरोना महामारीने उच्चांक गाठलेल्या या काळात वैद्यकीय सुविधेसाठी रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.माध्यमे विविध संस्था यासाठी आवाहन करीत आहेत.या अनुषंगाने रोटरी क्लब फोरच्यून,रोटरी क्लब स्पोर्टसिटी,रोटरी क्लब औंध व रोटरी क्लब बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.बालकल्याण संस्था पुणे विद्यापीठ रस्ता येथे संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरात सुमारे ४५ जणांनी रक्तदान केले.यात महिला व प्रथमच रक्तदान करणारे रक्तदाते यांचा सहभाग लक्षणीय होता.या प्रसंगी रोटरी फोरच्यूनच्या अध्यक्ष रो.सारिका रोडे.रोटरी स्पोर्टसिटीचे अध्यक्ष मनोजित चौधरी,रोटरी औंधचे अध्यक्ष मुकुंद सुकूटवार,रोटरी बाणेरचे अध्यक्ष नितिन वाघ,आदि मान्यवर उपस्थित होते.रुबी हॉल क्लिनिकच्या रक्तपेढीने शिबिराचे तांत्रिक संचालन केले.

छायाचित्र :महिला रक्तदाता व मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite