Peoples Media Pune header

Go Back

बेकायदा कामगार कपाती विरुद्ध भारतीय कामगार सेनेचे डेक्कन जिमखाना विरुद्ध आंदोलन

12 Sep 2020

डेक्कन जिमखाना क्लब व्यवस्थापनाने २ सप्टेंबर रोजी दोन महिला व एक पुरुष कर्मचार्‍यांना बेकायदेशीररित्या कोव्हीड १९ चे कारण दाखवून कामावरून काढून टाकले.या अन्यायाच्या विरोधात भारतीय कामगार सेनेच्या वतीने सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्या पुढाकाराने डेक्कन जिमखाना क्लब मेन गेट येथे आंदोलन करण्यात आले.यावेळी बोलताना श्री कुचिक यांनी केंद्र व राज्य सरकार यांनी साथी रोग कायदा १८७७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि दिनांक २४ मार्च २०२० पासून कोरोना विषाणू साथ लागू झाला असून त्यात कुठल्याही कर्मचा-यास /कामगारास कमी करण्यात येवू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.तसेच सादर क्लबची आर्थिक बाजू उत्तम असून जवळजवळ ६ कोटी रुपयांची कामे आजूनही सुरू आहेत.या तथाकथित प्रथितयश संस्थेने या कामगारांचे निलंबन रद्द करावे अन्यथा भारतीय कामगार सेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला.  

छायाचित्र :रघुनाथ कुचिक,पीडित कामगार व आंदोलक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite