Peoples Media Pune header

Go Back

जी एस फाउंडेशन व पुणे मनपाने केली कात्रज घाट सफाई.

14 Sep 2020

पुणे शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर अनेक योजना आखल्या जातात.यात स्वयंसेवी संस्था नागरिकानी सहभाग घेतला तर ते काम अधिक चांगले होते.या अनुषंगाने जी एस फाउंडेशन व पुणे मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने जी एस फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त कात्रज घाट स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यात पुणे महानगर पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन तसेच धनकवडी क्षेत्रीय कार्यालय आणि जीएस फाऊंडेशनचे कार्यकर्ते,व महानगर पालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक सुभाष परदेशी,मंगलदास माने,विभाग सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक,तानाजी नरले,जीएस फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश जाधव,महेश परदेशी,हेमलता परदेशी,स्नेहल पलंगे,तानाजी शेलार,अमर रजपूत,सूरज वाळूंज,सागर ननवरे,राखी परदेशी,आदि मान्यवर सहभागी होते.

छायाचित्र :कात्रज घाट स्वच्छता अभियान राबवितांना मान्यवर.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite