Peoples Media Pune header

Go Back

कोव्हिड १९ वर प्रथम उत्तम उपचारासाठी फेज २ क्लिनिकल ट्रायल पास होणारे जीपीलाईफचे अॅक्ट १२ टॅब्लेटस आणि अॅक्ट १३ ड्राय सिरप हे औषध तयार आणि त्याचे वैश्विक व्यापारीकरणाचे सर्व हक्क सॅडो फार्मा व्हेंचर्सकडे.

17 Sep 2020

“कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह म्हणून इस्पितळात दाखल झालेल्या रुग्णांवरती फेज २ क्लिनिकल चाचणी सर्वप्रथम पास झालेली ही न्यूट्रास्युटिकल उत्पादने जगात प्रथमच आहेत.दोन्ही उत्पादनांचे उपचार पातळीवर अनेकविध फायदे आहेत आणि त्याची निर्मिती अनेक वर्षांच्या संशोधनातून करण्यात आली आहे”.असे जीपीलाईफचे कार्यकारी संचालक(मॅनेजिंग डायरेक्टर)डॉ.श्रीधर पांडया म्हणाले॰कोव्हिड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांना देत येणार्‍या साधारण उपचार पद्धतीपेक्षा ही उत्पादने जवळ जवळ ४०%अधिक उत्तम कामकरतात.कोव्हिड-१९च्या पुण्यातील इस्पितळात दाखल झालेल्या रुग्णांवर या चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यातील ६०-६५% रुग्ण ४ दिवसांच्या उपचारानंतर निगेटिव्ह झाले आणि इतर क्लिनिकल लक्षणेदेखील बरी होत असल्याचे दिसून आले.७ दिवसांच्या पुढे १००%रुग्ण निगेटिव्ह झाल्याचे आणि १० दिवसापर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसल्याचे दिसून आले.यात मृत्युदर 0 %  होता.दुसर्‍या बाजूला स्टँडर्ड उपचार केलेल्यामध्ये ७ रुग्ण १० दिवसांच्या साधारण प्रचलित उपचारानंतरही पॉझिटिव्ह असल्याचे अढळले॰ही दोन औषधे अॅंटी-इंफ्लेमेट्री आणि अॅंटी व्हायरल म्हणून कार्य करतात आणि ४-७ दिवसांतच या औषधांच्या उपचाराद्वारे सीआरपी आणि एलडीएच लाक्षणिकपने कमी झाल्याचे व प्लेटलेट्सची स्थिति सुधारल्याचे दिसून आले.२ ते ३ दिवसात एसपीओ२(SPO2)आणि श्वासोच्छवास सुधारल्याचे दिसून आले.आणि श्वसनाला अडचणी येत असलेल्या रुग्णांना ऑक्सीजन देत राहण्याची गरज भासत नसल्याचे दिसले.

     श्री किरण नरसिह पै,एमबीए,आयआयएम कलकत्ता,जीपीलाईफ हेल्थकेअरचे सल्लागार यांनी या चाचणीचे निष्कर्ष अत्यंत महत्वाचे असल्याचे संगितले.प्रसाद कानिटकर,मुख्यतांत्रिक अधिकारी सँडो फार्मा म्हणाले. “विज्ञान आणि नैसर्गिक संसाधने यांच्या एकत्रित वापराचे फलित म्हणजे औषधे आणि हे तंत्रज्ञान होय.सॅडो फार्मा वैश्विक बाजरांमधील संशोधन व विकसन,फार्मा व ओटीसी उत्पादनांचे उत्पादन व पुरवठा या क्षेत्रात कार्यरत आहे. सौ.निता नितिन कदम या सॅडो फार्माच्या संचालक असून औषधनिर्माणशस्त्राच्या पदवीधर आहेत.त्या पुढे म्हणतात,“येत्या काळात भारतातील ई-कॉमर्स आणि आधुनिक साखळी बाजारपेठांसाठी वैयक्तिक आणि महिलांसाठी अशा उत्पादनांची निर्मिती आणि वितरण करणार आहे.“सध्या चालू असलेल्या महामारीमध्ये जगाला सगळ्यात जास्त गरजेची असलेली गोष्ट म्हणजेच सर्वोत्तम उपचार पद्धती उपलब्ध करून देणे,जीपी लाईफ सोबत कोव्हिड-१९ च्या फेज २ मानवी चाचणीवर पात्र ठरलेला औषधोपचार जगाला देणे हे सॅडो व्हेंचरच्या ध्येयाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite