Peoples Media Pune header

Go Back

सोलार उद्योजकांच्या समस्यां विषयी,मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ग-हाणे.

22 Sep 2020

महावितरणने महाराष्ट्राच्या सोलर निर्मिती उद्योग नष्ट करून गुजरातच्या कंपन्याचे उद्योग वाढविण्यासाठी केलेल्या बेकायदेशीर खटपटी केल्या.त्याविषयी माहिती-निवेदन मा.मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष मुकुंद कमलाकर यांनी दिले आहे.यात केंद्र सरकारने २ वर्षात ग्राहकांना १ ही रुपया अनुदान न देणे,महवितरणच्या जाहिरातीतील जीएसटी नंबर गुजरात राज्याचा आहे.म्हणजेच ते पैसे महाराष्ट्राला न मिळता गुजरातला मिळतील.गुजरात राज्याला ८०० मे वॅट संयंत्र साथी मंजूर मात्र महाराष्ट्राला २५ मे वॅटच मंजूर.नेट मिटर प्रकिया किमान ४५ व कमाल कितीही त्यामुळे वीज वाया जाते.थोडक्यात म्हणजे महाराष्ट्रातील सोलर उद्योग ज्यात १५०० लहान मोठे उद्योजक आहेत व त्यावर किमान १५ लाख नागरिक आवलंबून आहे ते क्षेत्र नष्ट करण्याचा कुटिल डाव आहे.व हे सर्व सरकारला अंधारात ठेऊन केले जात आहे.त्यावर योग्य ती उपाय योजनेचे आवाहन आहे.तसेच १ केडब्ल्यू छोट्या प्रकल्पाने १ वर्षात १००० किलो कार्बन डाय ऑक्साईड हवेत पसरण्यापासून वाचतो हे नमूद करण्यात आले आहे.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite