Peoples Media Pune header

Go Back

विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या0 निवेदकांची “महा अॅंकर असोसिएशन”.स्थापन

29 Sep 2020

कलेच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे निवेदक-अॅंकर यांची “महा अॅंकर”.असोसिएशन स्थापन करण्यात आली आहे.कलेच्या सर्व घटकातील निवेदकांना संघटित करणे,शासनाच्या संस्कृतिक कार्यक्रमात या असोसिएशनच्या सभासदांना प्राधान्य मिळावे यासाठी पाठपुरावा करणे,शासन दरबारी निवेदकांना कसे अधिकृत करता येईल यासाठी प्रयत्नशील राहणे,शासकीय योजनांचा लाभ निवेदकांना मिळवून देणे,या असोसिएशन मधील सभासदांचे अधिकृत ओळखपत्राचे स्मार्ट कार्ड त्यांना देण्यात येईल सोबत एक वर्षाचा अपघाती विमा मोफत दिला जाईल,असोसिएशनच्या अधिकृत पेजवर सभासदांची पूर्ण माहिती(प्रोफाइल)टाकली जाणार आहे.तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणे आवश्यक आहे.या सभासदांचे जर कोणी निर्माता इव्हेंटवाले लोक पेमेंट बुडवत असेल किंवा टाळत असतील तर असोसिएशनच्या वतीने अधिकृत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.व आपल्याला न्याय दिला जाईल.असोसिएशनच्या कार्डाचा किंवा सभासदत्वाचा परिणाम तुमच्या अभिनय क्षेत्रावर होणार नाही,अभिनेता/मॉडेल म्हणून जे काही करत असतील त्याच्यावर याचा काही परिणाम होणार नाही.हे फक्त अॅंकर म्हणून काम करतांना कोणती अडचण येऊ म्हणून आणि आपल्या सुरक्षितते साठीच आहे.अशी माहिती अध्यक्ष योगेश सुपेकर,उपाध्यक्ष संतोष चोरडिया,सचिव जतीन पांडे,कार्यकारिणी सदस्य संदीप पाटील.यांनी पत्रकार परिषदेत दिली.अधिक महितीसाठी योगेश सुपेकर मो.9075021152,जतिन पांडे 9822640019.

टिप :आपल्या सुविधेसाठी ही प्रेसनोट www.peoplesmediapune.comयेथे युनिकोडमध्ये उपलब्ध आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite