Peoples Media Pune header

Go Back

युवाहितच्या देशप्रेम जनजागृतीसाठी “जरा याद करो कुर्बानी”.अभियानास सुरुवात.

08 Oct 2020

आजच्या पिढीला स्वातंत्र्य संग्राम व त्यातील बलिदान याचे काहीसे विस्मरण झाले आहे.आजच्या पिढीला स्वातंत्र्य विनासायास उपभोगायला मिळाले आहे.मात्र यामुळे स्वातंत्र्याचे महत्व व त्यासाठी हजारो जणांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण राहिले नाही.व यामुळे लोकांच्या हृदयात देशभक्ती देशसेवा,व देशाच्या प्रती कर्तव्याची जाणीव धूसर होत चालली आहे.या अनुषंगाने युवाहीत या २० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थेने “जरा याद करो कुर्बानी”या ऑनलाइन अभियानास महात्मा गांधीजींच्या १५१ व्या जन्म दिनापासून सुरुवात केली आहे. यात आपल्या देशविषयी महत्वाची माहिती,परदेशातील थोर व्यक्तींनी भारताविषयी काढलेले उद्गार,जगात भारत ज्या ज्या बाबीत अग्रेसर आहे ती माहिती याविषयी विविध पोस्टर्स बनवून पाठवली जातील.यात सहभागी होवू इच्छिणार्या व्यक्तींनी ती पोस्ट आपल्याशी जोडलेल्या ग्रुप्सवर फॉरवर्ड करायची आहे.यात सर्वांना सहभागी होता येईल असे युवाहितचे ट्रस्टी हितेंद्र सोमाणी यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.संपर्क ई मेल hitendra@hitendra.co.in

सोबत:नमूना पोस्टर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite