Peoples Media Pune header

Go Back

स्रियांची आज जी व्यापक चळवळ दिसते आहे,त्या व्यापक चळवळीमध्ये उषाताई दातार यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचे खूप मोठे योगदान आहे.महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गो-हे यांनी त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त केला.

15 Oct 2020

जनवादी महिला संघटनेच्या आणि स्त्री मुक्ति चळवळीच्या कार्यकर्त्या माननीय उषाताई दातार यांचे दु:खद निधन झाले आहे.१९८० च्या दशकामध्ये पुण्यामध्ये क्रांतिकारी संघटना आणि स्त्री आधार केंद्र यांच्या कामाला मी सुरुवात केली.त्यांच्यानंतर अनेक महिलांच्या आंदोलनामध्ये,महिला विषयक परिषदांमध्ये,स्रियांच्या अभ्यास वर्गामध्ये,माला विविध विचारांच्या महिलांशी बोलण्याची,भेटण्याची संधि मिळाली.त्यानंतर नव्वदीच्या दशकानंतर उषा दातार यांचा माझा परिचय झाला.त्यांच्याबद्दल कायम मला उत्सुकता वाटायची की एक मध्यमवर्गीय गृहिणी परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट विचारांमध्ये त्यांनी स्वत:च्या योगदान देण्याची सुरुवात केली.तळागाळामध्ये उषाताईंनी स्वत:ची ओळख या प्रकारे दिली.पण त्यांचा हेतू कधीच स्वत:ची ओळख वाढवणे –देणे हा नव्हता.ज्या शिक्षणाच्या क्षेत्रांमध्ये उषाताई दातार यांनी इतकी वर्ष काम केले होते व आता त्या एका अर्थाने सर्वहारा,शोषित यांच्या चळवळीच्या विद्यार्थिनी म्हणून उषाताई काम केआरटी होत्या. स्वत:च्या शिक्षक होण्याचं अनुभवातून फायदाही चळवळीला करून देत होत्या.त्यांनी सर्वहारा महिला संघटना,घर कामगार महिला संघटना,बाल हक्क समिति अशा अनेक कार्यक्रमांमध्ये उषाताई दातार यांचा प्रेमळ असा सुपरिचित असा सहभाग होता.त्यांच्या दु:खद निधनाबद्दल मी श्रद्धांजली व्यक्त करते.उषाताईंच्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिले त्या कार्यकर्त्या व त्यांच्या कुटुंबिय या प्रत्येकाला हे सर्व दु:ख सहन करण्याची शक्ति मिळावी अशी मी अपेक्षा करते.स्त्रियांची आज जी व्यापक चळवळ दिसते आहे,त्या व्यापक चळवळीमध्ये उषाताई दातार यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचे खूप मोठे योगदान आहे आणि मी त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करते. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite