Peoples Media Pune header

Go Back

खाजगी कोचिंग क्लास सुरू करा या मागणीसाठी कोचिंग क्लास असोसिएशन व परफेक्ट क्लासतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

27 Oct 2020

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळा,महाविद्यालये,कोचिंग क्लासेस बंद आहेत.याचा सर्वाधिक फटका खासगी क्लास चालक व शिक्षकांना बसला आहे.हे क्लासेस योग्य ते फिजिकल डिस्टन्सिंग व खबरदारीचे पालन करून सुरू करण्यात यावे याबद्दल कोचिंग क्लासेस असोसिएशन व फरफेक्ट क्लास यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी कोचिंग क्लासेस असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग मंडकिकर,परफेक्ट कोचिंग क्लासचे इरफान सय्यद,प्रा.पी.एम वाघ,ज्ञानेश्वर ढाकणे,अप्पासाहेब म्हस्के पाटील,यशराज चव्हाण,उमेश बोरसे आदि मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :उपस्थित मान्यवर व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite