Peoples Media Pune header

Go Back

“माझे कुटुंब माझी जबाबदारी”जनजागृती अभियानाची सुरुवात

27 Oct 2020

जिल्हाधिकारी कार्यालय,नेहरू युवा संघटन,जिल्हा परिषद पुणे व युवाहित यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या महाराष्ट्र शासनाच्या  जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली.धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर,युवाहितचे मुख्य कार्यकारी अधिकारी हितेंद्र सोमणी आदी मान्यवर उपस्थित होते.सदर उपक्रमास डॉ.राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे,आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा पुणे यांनी शुभेच्छा दिल्या. शासनाच्या कार्यात स्वयंसेवी संस्था व नागरिकानी सहभाग घेतल्यास योजनेचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो असे हितेंद्र सोमणी यांनी नमूद केले.

छायाचित्र :अभियानाची सुरुवात करतांना मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite