Peoples Media Pune header

Go Back

छावा ग्रुपमहाराष्ट्र राज्यच्या वतीने नागरिकांना जीवनावश्यक किराणा किट वाटप.

27 Oct 2020

देशात तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोनाने थैमान घातले असून अनेक उद्योग व त्या अनुषंगाने नागरिकांच्या आर्थिक स्थितीस दणका बसला आहे.अशा परिस्थितीत छावा ग्रुपच्या वतीने नागरिकांना नुकतेच महिन्याच्या किराणा किटचे वाटप करण्यात आले.यासाठी महाराष्ट्र राज्य छावा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पैलवान आप्पासाहेब आखाडे,प्रदेश अध्यक्ष पैलवान पै.रविभाऊ आखाडे,छावा ग्रुपचे सचिव संजय बालगुडे यांनी यात विशेष पुढाकार घेतला.शेती व उद्योग उद्धस्त झाल्यामुळे या काळात हॉस्पिटल बिले कमी करवणे,रक्तदान शिबिरे व अन्य सेवाकार्य केल्याचे संजय बालगुडे यांनी नमूद केले.

छायाचित्र :किराणा किट वाटप करताना मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite