Peoples Media Pune header

Go Back

*तेंव्हा राधासुता कुठे गेला होता तुमचा धर्म ? ना.ऊद्धवसाहेब ठाकरे यांनी धमकी दिली म्हणता तर आपण काय बोलला होता ?* डॉ.नीलम गोऱ्हे, शिवसेना प्रवक्त्या यांचा घणाघात

28 Nov 2020
*तेंव्हा राधासुता कुठे गेला होता तुमचा धर्म ? ना.ऊद्धवसाहेब ठाकरे यांनी धमकी दिली म्हणता तर आपण काय बोलला होता ?* डॉ.नीलम गोऱ्हे, शिवसेना प्रवक्त्या यांचा घणाघात पुणे/मुंबई दि. २८: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषेला अशोभनीय म्हटले याबद्द्ल आश्चर्य वाटले, कदाचित फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांची साम दाम दंड भेद ची भाषा अजून विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आत्मसात न केल्याने त्याना मा.ना.ऊद्धवसाहेब ठाकरेंची सुसंस्कृत आणि अरे ला कारे करण्याची रोखठोक मर्हाठी पण संस्कारात्मक भाषा अशोभनीय वाटली असावी !! असा टोला लगावत विरोधी पक्ष नेत्यांची कीव करावी की त्यांच्या असहायतेवर व त्याबद्दल सहानुभूती व्यक्त करावी असा प्रश्न नीलमताई गोर्हेंना पड़ला आहे. भाजपाची फौज कधी महिला तर कधी पत्रकार यांना पुढे करुन मा.मुख्यमंत्री यांचा एकेरी भाषेत टिका नव्हे तर ऊद्धार करतात मग मा.मुख्यमंत्री यांनी फक्त प्रांजळ घणाघात केला तर त्यांचे म्हणणे एवढे कां जिव्हारी लागले ? असा प्रश्नही डॉ.नीलमताईं गोऱ्हे यांनी विचारला आहे. योगेश - ९०२८३३३३०५ प्रवीण - ७९७२७७०५३३

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite