Peoples Media Pune header

Go Back

द महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या अध्यक्षपदी विलास आहेरकर यांची निवड.

01 Dec 2020

द महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या अध्यक्षपदी विलास आहेरकर यांची निवड करण्यात आली.संघटनेच्या यादव व्यापार भवन शिवाजीरस्ता येथील मुख्यालयात झालेल्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष शरद सूर्यवंशी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.उपाध्यक्षपदी मनोज चितळीकर,सचिव स्वप्नील शहा,सहसचिव उमेश दांगट,खजिनदार प्रसाद देशपांडे यांची निवड करण्यात आली.या प्रसंगी माजी अध्यक्ष ब्रिजमोहन शर्मा,नरेंद्र सोनवणे आदी मान्यवरांच्या बरोबरच बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.याच सभेत संघटनेचे नाव पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटना. ऐवजी “द महाराष्ट्र कर सल्लागार संघटना” असे करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.  

छायाचित्र : विलास आहेरकर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite