Peoples Media Pune header

Go Back

शिवसेनेच्या दैनंदिनीचे प्रकाशन ना.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते प्रकाशन.

09 Jan 2021

किरकटवाडीचे सरपंच गोकुळ निवृत्ती करंजावणे यांनी तयार केलेल्या शिवसेना दैनंदिनीचे प्रकाशन ना.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सिल्व्हर रॉक्स या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी गोकुळ निवृत्ती करंजावणे,पंचायत समिति सदस्य हवेली सुवर्णा करंजावणे,ग्रामपंचायत सदस्य रूपाली करंजावणे,युवा नेते गौरव करंजावणे,मा.जिल्हा संघटिका स्वाती ढमाले,स्त्री आधार केंद्राच्या अश्विनी शिंदे,मा.शिक्षण मंडळ पुणे सदस्य शिरीष फडतरे,उपशहर प्रमुख आनंद गोयल,राजू विटकर आदी मान्यवर उपस्थित होते. या दैनंदिनीच्या २०००० वीस हजार प्रती परिसरात मोफत वितरित करण्यात येणार आहे. हा उपक्रम गेली १४ वर्ष राबवित आहोत असे गोकुळ करंजावणे यांनी नमूद केले.  

छायाचित्र :ना.डॉ. नीलमताई गो-हे,गोकुळ करांजवणे व अन्य मान्यवर.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite