Peoples Media Pune header

Go Back

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे खा.डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

10 Jan 2021

वंदनीय बाळासाहेब ठाकरेशिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. काही कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे शहर प्रमुख व कार्यक्रमाचे संयोजक राजाभाऊ भिलारे,वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख मंगेश चिवटे,शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र काळे,जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर,मा.जिल्हाप्रमुख राजाभाऊ रायकर,स्थानीय लोकाधिकार समितीचे मोहनराव दुधाने,आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलतांना खा.श्रीकांत शिंदे यांनी या कक्षाद्वारे वैद्यकीय मदत गरजूंपर्यंत पोचविणे हे महत्वाचे कार्य असून आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात ही सेवा दिली जाईल असे प्रतिपादन केले.या प्रसंगी बोलतांना राजाभाऊ भिलारे यांनी कोरोना लॉकडाऊन काळात नागरिकांची  वैद्यकीय बिले कमी करवून देणे,बेड,ऑक्सीजन उपलब्ध करून देणे,व अन्य सेवा मोठ्या प्रमाणात दिल्याचे संगितले.  

छायाचित्र : उद्घाटन करताना खा. श्रीकांत शिंदे,राजाभाऊ भिलारे व अन्य. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite