Peoples Media Pune header

Go Back

महाराrष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.ना.रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दि.०८ जानेवारी, २०२१ पासुन विधानपरिषदेच्या ०३ समित्यांच्या प्रमुख पदी ना.डॉ.नीलम गोऱ्हे, उप सभापती, विधानपरिषद यांची नियुक्ती केली आहे.

13 Jan 2021
*विधानपरिषदेच्या विनंती अर्ज समितीच्या* ना.डॉ.नीलम गोऱ्हे या प्रमुख असुन श्री.अनिकेत तटकरे, श्री.शरद रणपिसे, श्री.प्रविण पोटे पाटील इत्यादींची या समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. *विधानपरिषदेची अशासकीय विधेयक व ठराव समितीच्या* प्रमुख पदी ना.डॉ. गोऱ्हे, उप सभापती, विधानपरिषद व सदस्य पदी श्री.विलास पोतनीस, श्री.अभिजित वंजारी, श्री.प्रविण पोटे पाटील इत्यादींची नियुक्ती करण्यात आली आहे. *विधानपरिषदेच्या सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवणेबाबत तदर्थ समितीच्या* प्रमुख पदी ना.डॉ.गोऱ्हे, उप सभापती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर समितीचे सदस्य म्हणून गोपिकिशन बाजोरिया, श्री.अमोल मिटकरी, श्री.अभिजित वंजारी, श्री.जयंत आसगावकर, श्री.रामनिवास सिंह,इत्यादींची नियुक्ती करण्यात आली आहे.श्री.संजयकुमार, मुख्य सचिव हे या समितीवर सदस्य असतील तसेच श्री.प्रविण दरेकर, विरोधी पक्ष नेता, ॲड. श्री.अनिल परब, मंत्री, श्री.सतेज पाटील, राज्यमंत्री, श्री..संजय बनसोडे, राज्यमंत्री, यांची सदर समितीवर विशेष निमंत्रीत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.राजेंद्र भागवत हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच *विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीमध्येही* सदस्य म्हणून ना.डॉ. गोऱ्हे, उप सभापती, विधानपरिषद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite