Peoples Media Pune header

Go Back

एरीना अॅनिमेशन येथे भरती मोहीम संपन्न.

14 Jan 2021

कोरोना महामारीने अनेक क्षेत्रांना फटका बसला.मात्र त्यातूनही आता सुधारणा होत आहे.अनेक लोकांचे रोजगार गेले.त्यामुळे आता रोजगार मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे.हे  लक्षात घेवून एरीना अॅनिमेशन टिळक रस्ता येथे ग्रीन गोल्ड अॅनिमेशन यांच्यावतीने २ डी अॅनिमेटर्स साठी नुकतीच भरती मोहीम राबविण्यात आली.ग्रीन गोल्डने प्रसिद्ध व्यक्तिरेखा “भीम” साकारली आहे. ग्रीन गोल्डचे एच आर हेड मेहर प्रसाद यांनी चाचणी घेवून विद्यार्थ्यांना रोजगारसंधी दिली.या प्रसंगी एरीना अॅनिमेशनचे केंद्रचालक आशिष राठी यांनी या मोहिमेचे संचालन केले.व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.ही शाखा गेली २४ वर्ष अॅनिमेशन,व्ही एच एफ (व्हिज्युअल इफेक्ट),व ग्रफिक्स क्षेत्रांत कार्यरत आहे.या भरती महिमेत २५ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला.या कोरोना (लॉकडाऊन) काळात ही या शाखेने सुमारे ५० व्यक्तींना रोजगाराचा लाभ मिळवून दिला होता.या क्षेत्रांत आवड असणार्‍या व या क्षेत्रात येवू इच्छिणार्‍यानी www.arenatilakroad.com वेबसाइट किंवा मेल – info@arenatilakroad  येथे संपर्क करावा असे आशिष राठी यांनी नमूद केले.

छायाचित्र :भरती मोहीम प्रसंगी डावीकडे मेहर प्रसाद,उजवीकडे आशिषराठी. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite