Peoples Media Pune header

Go Back

इंडियन प्रेस कौन्सिलच्या पुणे शहर अध्यक्षपदी सलील पाटील.

16 Jan 2021

इंडियन प्रेस कौन्सिल या संस्थेच्या पुणे शहर अध्यक्षपदी सलील पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.मॉडेल कॉलनी येथील कार्यालयात इंडियन प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष दिलीप सवणे यांनी त्यांना नियुक्तिपत्र दिले.या प्रसंगी मार्गदर्शक अॅड.सतीश एरम होते. सलिल पाटील हे गेल्या अनेक वर्षात आपल्या कुटुंबाचा सामाजिक वारसा चालवत आहेत.त्यांनी कोरोना महामारीच्या या काळात अनेक सामाजिक,जनहितार्थ उपक्रम राबविले.यात गरजूंना अन्नधान्य,जीवनावश्यक औषधे,कोविड योद्धयांना सँनिटायझर,मास्क ऑक्सीमीटर वाटप केले. आगामी काळात मूलभूत गरजा,युवकांसाठी रोजगार,महिला संरक्षण,कायदेविषयक सल्ला व समुपदेशन,नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांत कार्य करणार असल्याचे नवनियुक्त पुणे शहर अध्यक्ष सलील पाटील यांनी या वेळी नमूद केले.

छायाचित्र :सलील पाटील. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite