Peoples Media Pune header

Go Back

संत सेवालाल यांची जयंती पिरंगुट येथे साजरी

16 Feb 2021

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही श्री संत सेवालाल यांची 282 वी जयंती पिरंगुट,ता,मुळशी येथे मोठ्या उत्साहात,वाजत गाजत मिरवणूक काढून साजरी करण्यात आली.जयंती निमित्त तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय मंडळी उपस्थित होते. बंजारा क्रांती दल संघटनेचे तालुका संस्थापक आणि भावना फाउंडेशनचे संस्थापक मा.सुनील राठोड यांच्या आवाहना नुसार मोठ्या संखेने तालुक्यातील सामाज एकत्र झाला होता. बंजारा समाजातील आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठी शासनाचे नवनवीन योजना तालुकास्तरावर राबविण्याचे काम उद्येाजक सुनील राठेाड हे गेली अनेक वर्षापासून करत आहेत.बंजारा समाजातील बांधवांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्नशील असल्याचे सुनील राठोड यांनी या प्रसंगी संगितले.कार्यक्रमाचे आयोजन भावना फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राठोड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले. यावेळी जि. प. सदस्य शंकरभाऊ मांडेकर, शिवसेना नेते राम गायकवाड, राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष विलास अमराळे, कांग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, रामदास पवळे , राहुल पवळे, सचिन जेारी, युवराज राठाेड, शिवाजी राठेाड उपस्थित हेाते या वेळी संधटनेवर नवीन पदाधिकार्यांचे नियुक्ति सुनिल राठेाड यांच्या कडुन करण्यात आली तालुका प्रमुख पद्ी विठ्ठल जाधव, उप- तालुका पदी दयानंद चव्हाण सचिव सुरेश पवार , महिला प्रमुख - देबाबाई चव्हाण यांची नियुक्ति करण्यात आली यावेळी , भानुदास राठाेड, विक्रम चव्हाण, रमेश चव्हाण , अक्षय राठाेड, सुनिल चव्हाण , संताेश पवार , अजय चव्हाण , पंजाब जाधव , मेाहन पवार , संजय चव्हाण तुकाराम चव्हाण हे उपस्थित हेाते छायाचित्र - सुनिल राठेाड यांच्यासाेबत ऊपस्तित मान्यवर

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite