Peoples Media Pune header

Go Back

भास्करराव म्हस्के यांच्या इच्छेनुसार धार्मिक विधींना फाटा देवून सामाजिक संस्थांना देणगी देणार.

19 Feb 2021

जुन्या पिढीतील स्थापत्य अभियंता व शेती आणि पाणी तज्ञ भास्करराव किसनराव म्हस्के यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार धार्मिक विधींना फाटा देवून समाज कार्यासाठी कुटुंबिय देणगी देणार आहेत . पुण्यातील प्रसिद्ध कॉर्न क्लबचे ते संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली,मुलगा सून आणि नातवंडे असा परिवार आहे. नगर जिल्ह्यातील माजी आमदार काकासाहेब म्हस्के यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होत.रस्ते,धरणे गृहनिर्माण आदी कामे त्यांनी केली,स्ट्रोबेरी व मधु मका-स्वीट कॉर्नची शेती व प्रक्रिया उद्योग उभे केले. तसेच नवउद्योजकांना मार्गदर्शन केले. तसेच पाणी,शेती क्षेत्रात लिखाण केले आहे.

छायाचित्र :स्व.भास्करराव म्हस्के. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite