Peoples Media Pune header

Go Back

भरत मित्रमंडळच्या भारतातील सर्वात मोठ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भित्तीचित्रास खा.अमोल कोल्हे यांची भेट.

20 Feb 2021

भरत मित्रमंडळ महाशिवरात्र उत्सव समितीने तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भारतातील सर्वात मोठ्या भित्तीचित्रास शिवजयंती निमित्त खा.अमोल कोल्हे यांनी भेट दिली.महानगरपालिकेच्या साने वाहन तळावर ५५ फुट उंच व २२ फुट रुंदीच्या हे चित्र निलेश खराडे यांनी चित्रित केले आहे. या कार्यक्रम प्रसंगी खा.अमोल कोल्हे,आयोजक निरंजन दाभेकर,बाळासाहेब दाभेकर,संजय बालगुडे,दत्ताभाऊ सागरे,दादा पासलकर,अनिल येनपुरे,संदीप पाटील,मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना खा.अमोल कोल्हे म्हणाले. “जगात शेकडो राजे होवून गेले,मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे शेकडो वर्षांनंतर ही सर्वांच्या मनात स्थान मिळवून आहेत. त्यांचा आदर्श यापुढे ही असंख्य पिढ्या घेतील असे संगितले.   

छायाचित्र :डावीकडून संजय बालगुडे,दादा पासलकर,अमोल कोल्हे,निरंजन दाभेकर,अनिल येनपुरे,बाळासाहेब दाभेकर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite