Peoples Media Pune header

Go Back

नटरंग अकॅडमीच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा २७ वा शाहीर मधु कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला गौरव पुरस्कार प्रदान सोहळा.

15 May 2023

दिनांक १७ मे २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे चला हवा येवू द्या या मालिकेमधून घराघरात पोहोचलेल्या गुणवान विनोदी अभिनेत्री श्रेया बुगडे यांना श्री.गौरव गिरीश बापट यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. नटरंगच्या वतीने आयोजित एका भव्य सोहळ्यात हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. शाल श्रीफळ,तुळशीचे रोप,महावस्त्र,फळांचा बुके,गौरव पत्र,रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

     या सोहळ्याला पुण्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील,आमदार माधुरीताई मिसाळ,नगरसेवक हेमंत भाऊ रासणे,नगरसेवक राजेश येनपुरे,नगरसेविका गायत्री खडके,असे मान्यवर उपस्थित राहणार असून कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती राहणार आहे. ज्यामध्ये लीला गांधी,आशा काळे,प्रिय बेर्डे,प्राजक्ता माळी,जयमाला ईनामदार,सुहासिनी देशपांडे,मेघराज राजेभोसले,दादा पासलकर,यांचा समावेश आहे. या प्रसंगी नटरंगच्या बालकलाकारांचा नृत्यरंग हा नृत्य आणि विनोदाने परिपूर्ण कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.    संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय गिरीशभाऊ बापट यांच्या निधनानंतर हा पहिलाच कार्यक्रम होत असल्याने त्यांच्या नावे स्वर्गीय गिरीश बापट कृतज्ञता पुरस्कार या नव्या पुरस्काराने मतिमंद मुलांसाठी गेली २५ वर्ष कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते श्री प्रमोद भालेराव यांना गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे लेखन व दिग्दर्शन श्री जतिन पांडे यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन श्री प्रणव कडेकर यांनी केले आहे.

छायाचित्र : श्रेया बुगडे. . 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite