Peoples Media Pune header

Go Back

पै. पंकज पवार यांनी जिंकली दत्तवाडी कुस्ती स्पर्धा चांदीची गदा.

18 May 2023

इंदापूर येथील पंकज पवार यांनी जिंकली अखिल दत्तवाडी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेची चांदीची गदा.स्पर्धेचे आयोजन पै निलेश गायकवाड यांनी केले होते. आ.रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते गदा प्रदान करण्यात आली.या स्पर्धा प्रसंगी आ.निलेश लंके,अंकुश काकडे,बाळासाहेब दाभेकर,सत्यवान उभे,बाबू अण्णा मोहोळ,भुपेंदर मोरे,विशाल धनवडे व अखिल दत्तवाडी उत्सव कमिटीचे सर्व सभासद उपस्थित होते. या स्पर्धेत १५० जणांनी सहभाग घेतला. याप्रसंगी बोलतांना आ.निलेश लंके व रविंद्र धंगेकर यांनी कुस्ती स्पर्धा अनेक जण भरवतात मात्र सलग विक्रमी १३ वर्ष कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन पै निलेश गायकवाड यांचे कौतुक आहे असे संगितले. 

छायाचित्र : पंकज पवार यांना चांदीची गदा प्रदान करतांना रविंद्र धंगेकर निलेश गायकवाड व अन्य मान्यवर. 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite