Peoples Media Pune header

Go Back

प्रा.मीना आंबेकर यांच्या “कोलाज: समृद्ध विचारांचा” पुस्तकाचे प्रकाशन.

05 Jun 2023

प्रा.मीना आंबेकर लिखित “कोलाज :समृद्ध विचारांचा’या पुस्तकाचे प्रकाशन संत साहित्याच्या अभ्यासक आरती दातार यांच्या हस्ते करण्यात आले. डेक्कन येथील हिंदू जिमखाना यथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर,कुटुंबिय व स्नेही मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना आरती दातार यांनी या पुस्तकात मानवी मनात येणार्‍या विविध विचारांकडे सकारात्मक नजरेने पाहून आपले जीवन समृद्ध ठेवावे,व जीवनात आनंद मिळवावा हे सहज सोप्या पद्धतीने सांगण्यात आले आहे असे प्रतिपादन केले. लेखिका प्रा.मीना आंबेकर यांनी बोलतांना माणसांच्या मनात रोज हजारो विचार येतात व त्याचा परिणाम मानसिक व शारीरिक होतो यासाठी मनाला चांगल्या विचारांकडे सकारात्मक पणे पाहील्यास आनंद मिळतो असे संगितले. मयूर प्रकाशाने प्रकाशित केलेल्या पुस्तकास १९० पाने असून किमत २०० रुपये आहे.   

छायाचित्र : आरती दातार,मीना आंबेकर व कुटुंबिय. 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite