Peoples Media Pune header

Go Back

अजित सिंग कोचर यांच्या गौरवार्थ जिल्हास्तरीय बॉक्सिंगस्पर्धा संपन्न.

07 Jun 2023

बॉक्सिंग गुरु व दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते श्री अजित सिंग कोचर यांच्या गौरवार्थ भव्य अशी जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा खडकी येथे आयोजित करण्यात आली होती. तिचे आयोजन के.पी.बी.सी व स्टार बॉक्सिंग अकॅडमीच्या वतीने करण्यात आले. खडकी बाजार येथील लाल बहादुर विद्यालय येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी बॉक्सिंग गुरु अजित सिंग कोचर,प्रमुख पाहुणे आ. सिद्धार्थ दादा शिरोळे,कॅप्टन गुंडीदास कांबळे,खडकी कॅन्टोंमेंट छावणीचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर,खडकी कॅन्टोंमेंट बोर्डाचे सीईओ रॉबिन बालेजा,विकास जाधव,एपीआय खडकी निलेश खुडे,राजेश यादव,राजन शिंदे,रसूल शेख,अरुण मोरे,महेश पवार आदी मान्यवरांच्या बरोबरच खेळाडू व कुटुंबिय उपस्थित होते.

विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे – मुलांमध्ये प्रथम क्रमांक बेस्ट बॉक्सर अनिश शेख(के.पी.बी.सी. बॉक्सिंग क्लब खडकी),२)रजत चौधरी (बेस्ट चॅलेंजर बॉक्सर एम.आय.जी.एस बॉक्सिंग क्लब),३)रोहित नरकडे(मोस्ट प्रमोशन एस.एम.बी.सी बॉक्सिंग क्लब.  

मुलींमध्ये.प्रथम क्रमांक १)गर्ल्स बेस्ट बॉक्सर समीक्षा सूर्यवंशी(के.एल.व्ही.एस.पी.पुणे),२)जानवी सांगळे(क्लब स्टार बॉक्स अॅकॅडमी बेस्ट प्रमोशन बॉक्सर), ३)श्रेया धनगर (बेस्ट चॅलेंजरबॉक्सर एल.जी.एस.ए-पीसीएमसी).    

छायाचित्र : बक्षीस वितरण प्रसंगी डावीकडून अजित सिंग कोचर,सिद्धार्थ दादा शिरोळे व अन्य . 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite