Peoples Media Pune header

Go Back

छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायाची ओळख इन्टरनेटवर शक्य !

Pune 06 Oct 2011 Patrakar Bhavan

 

आज आपण गुगलवर मराठी फॉण्ट मध्ये तळणी मिरची कोठे मिळेल ?  त्याच प्रमाणे पुरणपोळी, केशरयुक्त खरवस, कडबोळी, धिरडे, थालिपीठ इत्यादी खास मराठी अभिव्यक्तीच्या वस्तू विकत घेण्यासाठी शोध घेतला, तर;  एक तर रिझल्टच येत नाहीत कारण ते इंटरनेटवर कोठेच नोंदविलेले नसतात आणि येणारे रिझल्ट आपल्याला उपयोगाचे नसतात हीच गोष्ट ईतर भाषांना लागू पडते. असंख्य वैशिष्ठपूर्ण शब्द, वस्तू आणि सेवा या प्रत्येक भाषेत असतातच, तसेच त्यांना निश्चित व्यावसायिक स्वरूपातील मुल्य असते. ते इंटरनेटवर असल्यामुळे अनेक नविन व्यवसायांचा जन्म होऊ शकतो.
 
आपला भारत देश अनेक प्रकारे समृद्ध आहे  आधुनिक युगात कॉम्प्युटर, इंटरनेट आणि मोबाईल टेक्नॉलॉजी मधील प्रगती, प्रसार, वापर समाधानकारक झालेला तर आहेच या शिवाय यांची उपयुक्तता आणि भविष्यकाळासाठीची सिद्धता निर्विवाद आहे. भावी काळात गरजेच्या प्रमाणात नोक-यांचा पुरवठा होणे अत्यंत अवघड आहे म्हणूनच व्यवसायाचा मार्ग अनिवार्य आहे. 
    
आज छोटे व्यावसायिक अत्यंत कठीण परिस्थीतीतून त्यांचा व्यावसाईक प्रवास करीत आहेत. इंटरनेटवर तर त्यांचे अस्तीत्वच नाही. या ना त्या मार्गाने ते टिकून रहाण्याचा प्रयत्न करतात. त्यांची इंटरनेटवर ओळख निर्माण होणे गरजेचे आहे. तरच संधी मिळेल.येणारा प्रत्येक दिवस अब्जावधी मागण्या निर्माण करत असतो हे विसरून चालणार नाही.
 
जाहिरात ही ग्राहकासाठी आहे, ग्राहकाच्या माहिती आणि गरजांच्या परिपूर्तीसाठी आहे तर त्या बद्दलची माहिती इंग्रजी बरोबरच प्रादेशिक भाषेत आणि इंटरनेटवर व्हावी आणि त्याचा फायदा तर असंख्य छोट्या व्यावसाईकांना व्हावा या हेतूने "जस्ट डिमांड" चे संचालक श्री विश्वजीत गिरीधारी यांनी http://justdemand.info  या नावाचे वेब पोर्टल तयार केलेले आहे. व्यावसायिकांच्या अडचणी, मर्यादा आणि त्यांचे हित लक्षात घेतानाच अब्जावधी ग्राहकांना हव्या असणा-या वस्तू आणि सेवांच्या आणि खास करून प्रादेशिक भाषेत व्यक्त होऊ शकणा-या वैशिष्टांची दखल घेत या वेब पोर्टलची निर्मिती केलेली आहे.
 
"जस्ट डिमांड - इझी बिझनेस" आणि "जस्ट डिमांड - रिच बिझनेस" असे दोन पर्याय व्यावसायिकांना उपलब्ध आहेत.या साठी येणारा खर्च हा आज पर्यंतचा सर्वात कमी खर्च आणि सर्वांना परवडणारा आहे. या माध्यमातून इंटरनेटवर त्यांच्या व्यवसायाची नोंद प्रथमच इंग्रजी भाषेत आणि प्रादेशिक भाषेत होणार आहे. या पोर्टलचे जास्ती-जास्त सदस्य व्हावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे श्री विश्वजीत गिरीधारी यांनी सांगितले आणि या पोर्टलला भेट देण्याचे आवाहन ही केले. अवश्य भेट द्या.  http://www.justdemand.info
 
 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite