Peoples Media Pune header

Go Back

पहिला "गौरव पुरस्कार" सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न.

Mumbai 17 Jan 2012 PPM

 

मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम (Marathimovieworld.com) या संकेतस्थळाच्यावतीने देण्यात येणारा पहिला "गौरव पुरस्कार" सोहळा १० जानेवारी रोजी  रवींद्र नाट्य मंदीर, प्रभादेवी मुंबई येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

मराठी रसिकांची लाडकी अभिनेत्री सई रानडे-साने हिने आपल्या प्रभावी आणि विनम्र शैलीत ह्या पुरस्कार सोहळ्याचे निवेंदन केले.

मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम गौरव पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सिनेमा, नाटक, मालिका, नायक, नायिका असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय प्रथमच मराठी चित्रपटस्रुष्टीतील ''प्रदर्शन पूर्व बहुचर्चित चित्रपट" हा एक नवीन विशेष पुरस्कार देण्यात आला, या पुरस्कारासाठी पहिल्या वर्षाचा
मान मिळाला तो 'शाळा' ह्या चित्रपटास. पुरस्कार वितारणादरम्यान विविध रंगतदार आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात मराठी लावणीनृत्य, लोकगीते, त्याच बरोबर गाजलेल्या मराठी गीतांवरील नृत्य सादरीकरणाचा समावेश होता. विशेष दाद मिळाली ती छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर आधारित असलेल्या सादरीकरणाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन "मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम" चे संस्थापक श्री. आर. डी. मोरे, श्री जितेंद्र मोरे, सिनिअर पत्रकार उल्हास शिर्के आणि कलाकारांच्या वतीने मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. मनोरंजन विश्वातील संपूर्ण माहिती बरोबरच विविध, नवीन, कल्पक सदरांद्वारे "मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम" हे संकेतस्थळ जगभरातील मराठी रसिक आणि मराठी मनोरंजन विश्वाला जोडणारा एक दुवा ठरणार आहे .

पहिल्या "मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम" गौरव पुरस्कारात, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला तो 'देउळ' या चित्रपटाने, महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार श्री. सौमित्र पोटे आणि नाट्य निर्माते श्री. गोविंद चव्हाण यांच्या हस्ते चित्रपटाचे निर्माते श्री. अभिजित घोलप ह्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'देउळ' ला मिळालेल्या ह्या पुरस्कारात आणि तिकीट खिडकीवरील मिळालेल्या यशामध्ये, प्रेक्षकांचा मोठा वाट आहे." अशा शब्दात चित्रपट निर्माते श्री. घोलप ह्यांनी आभार व्यक्त केले . 

मालिका विभागात 'गुंतता हृदय हे' , 'कालाय तस्मै नम:' , ' बंध रेशमाचे', 'पिंजरा' आणि 'पुढचे पाउल' ह्या मालिकांमध्ये मोठी स्पर्धा होती, त्यात प्रेक्षकांनी 'बंध रेशमाचे' ह्या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून आपली पसंती कळवली. प्रसिद्ध चित्रपट वितरक श्री. समीर दिक्षित आणि निर्मात्या सौ. उषा भावे यांच्या हस्ते 'बंध रेशमाच्या' टीमला पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तो भुषण प्रधान तर, मृणाल कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. चित्रपट दिग्दर्शक एफ. एम. इल्यास, आणि अभिनेत्री सई लोकूर यांच्या हस्ते भुषण आणि मृणाल यांना पुरस्कृत करण्यात आले. "गुंतता हृदय हे' मधील नायिकेची भूमिका साकारणे हे खरं तर खुप कठीण होते, आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीची पावती ह्या पुरस्काराद्वारे मिळाली. रसिकांचे असेच प्रेम लाभावे अशी आशा करते." अशा शब्दात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .

कार्याक्रमादरम्यान "हनिबी मेडिया" द्वारे अजून एक नवीन उपक्रमाची घोषणा करण्यात आली. मुंबई आणि मुंबईकर यांच्याबद्दल पुरेपूर आणि नवनवीन सदरांद्वारे माहिती देण्यात येणार असून विविध विषयांवर चर्चा करण्यासाठीचे एक व्यासपिठ देणारे 'www.magzmumbai.com' हे संकेतस्थळ असणार आहे. ह्याचे अनावरण अभिनेता राजेश शृंगारपुरे आणि अभिनेत्री हेमांगी धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले .

पुरस्कार वितरण सोहळ्यास अभिनेता प्रकाश भेंडे, राजेश शृंगारपुरे, सचित पाटील, आनंद इंगळे, गिरीश परदेशी, नरेश बिडकर, अक्षर कोठारी, कौस्तुभ दिवाण, अभिनेत्री उमा भेंडे, प्रतीक्षा लोणकर, हेमांगी कवी, मृण्मयी देशपांडे, सई लोकूर, सुपर्णा खर्डे, निर्मात्या विना लोकूर, उषा भावे, प्रसिद्ध संगीतकार श्रीरंग आरास, दिग्दर्शक एफ. एम. इल्यास, अजित भैरावकर, तसेच अनेक मान्यवर कलाकाराची उपस्थिती लाभली

 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite