Peoples Media Pune header

Go Back

’कर्तृत्ववान व्यक्तींचा समाजाने सन्मान करणे ही काळाची गरज’ प्रा. डॉ. सुधाकर जाधव

Pune 06 Jun 2011 People's Media Pune

समाजात विविध क्षेत्रात अनेक कर्तृत्ववान व्यक्ती या आपल्या असामान्य कर्तृत्वाने सामाजिक सेवेचे कार्य करीत असतात त्याची समाजाने दखल घेऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे ही काळाची गरज आहे’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुधाकर जाधव (डीन, कॉमर्स फॅकल्टी पुणे विद्यापीठ) यांनी केले. पाषाण सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने शिवाजीराव ज्ञानोबा निम्हण (असि.कमिशनर मुंबई पोलीस), रामदास राघोबा निम्हण (इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर पुणे), सुरेश रामचंद्र निम्हण (डेप्युटी मॅनेजर ऍडॉर पॉवरट्रॉन लि.) यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान झाल्यास त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते असे त्यांनी पुढे सांगितले, कार्यक्रमाचे संयोजन जयप्रकाश निम्हण यांनी केले. याप्रसंगी आ.विनायकरावजी निम्हण, ज्ञानेश्वर फडतरे (डी.सी.पी. झोन-), वसंत जाधव (.सी.पी. मुंबई), तानाजीभाऊ निम्हण, प्रमोद निम्हण आदी मान्यवरांबरोबरच ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस ’संतवाणी’ हा कार्यक्रम रघुनाथजी खंडाळकर यांनी सादर केला. सौरव ज्ञानेश्वर जगदाळे या कुमारवयीन क्रिकेटपटूचाही सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना सत्कारार्थींनी आपल्या प्रदिर्घ वाटचालीतील विविध अनुभव कथन केले व कुठल्याही संकटास न डगमगता चिकाटीने व सामाजिक जाणीव ठेवून काम केल्यास उज्वल यश मिळते असे सांगितले. तसेच आगामी काळात आपल्या अनुभवाचा उपयोग हा सामाजिक कार्यासाठी करण्याचा मनोदय व्यक्त केला.

(जयप्रकाश निम्हण, पाषाण सांस्कृतिक महोत्सव समिती.)

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite