Peoples Media Pune header

Go Back

महेश सेवा संघ ,भोजन व शुद्ध पिण्याचे पाणी वाटप

Pune 16 Apr 2012 PPM

पुणे(दि.१८)पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान महेश सेवा संघ पुणेच्या वतीने पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना दुपारचे व रात्रीचे भोजन आणि मिनरल वॉटर देण्यात आले.बेलबाग चौक ते सोन्या मारुती चौक,डुल्या मारुती ते नानापेठेतील क्वाटरगेट पर्यंत हे वाटप झाले.याचा लाभ सुमारे १५०० जणांना झाला.तसेच पुण्यात विसर्जनासाठी आलेल्या भक्तगण व हजारो नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी विजय टॉकीज लक्ष्मी रोड येथे पुरविण्यात आले.व लहान मुले,मुली महिला व ज्येष्ट नागरिकांना गोळ्या,चॉकलेट,व बिस्कीट वाटण्यात आले.महेश सेवा संघ  ही संस्था गेली  ३० वर्ष अविरत समाजसेवा कार्यात आहे.या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.या प्रसंगी आ.गिरीश बापट.श्रीकांत शिरोळे,संदीप खर्डेकर अशोक येनपुरे,महेश सेवा संघाचे अध्यक्ष जवाहर बाहेती,सचिव श्रीकांत लखोटिया, व भगीरथ राठी,शाम कलंत्री,गोपाळ लोया,त्रिंबक मुंदडा,आदी मान्यवर व सदस्य उपस्थित होते.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite