Peoples Media Pune header

Go Back

रोटरी पुणे पर्वती तर्फे पीपीई किटस आणि मास्कचे वाटप.

19 Apr 2020

जगव्यापी आलेल्या कोरोनाच्या संकटातला सामोरे जाण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती क्लब आणि ट्रस्टने २५० पीपीई(पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) ससून व औंध रुग्णालयांना देणगी स्वरुपात दिली. तसेच २००० मास्क ट्रॅफिक पोलिस,दत्तवाडी पोलिस स्टेशन,सहकारनगर पोलिस स्टेशन,महानगरपालिका सफाई कामगार यांना वाटण्यात आले.या उपक्रमासाठी रोटरी क्लब पर्वतीचे अध्यक्ष रो.सुरेश नगरकर,माजी प्रांतपाल रो.विनय कुलकर्णी,दिलीप सोहोनी,रो.नाथसाहेब खैरे,आणि मुख्य विश्वस्त रो.महेश सप्तर्षी यांनी विशेष सहकार्य केले.दत्तवाडी पोलिस स्टेशनचे पीआय घेवरे साहेब,सहकारनगर पोलिस स्टेशनचे पीआय,तसेच पुणे मनपाच्या वतीने थोरात साहेब यांनी वस्तु स्विकारल्या.

छायाचित्र :किट प्रदान करतांना मान्यवर 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite