Peoples Media Pune header

Go Back

' रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस चरित्र व कार्य’ या ग्रंथाचे प्रकाशन

27 Nov 2020

इतिहास संशोधक रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीसयांच्या १५० व्या जयंती निमित्त “रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस चरित्र व कार्य”या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे करण्यात आले त्या प्रसंगी डॉ.सुरेन्द्र पारसनीस अध्यक्ष  रावबहादुर द.ब.पारसनीस स्मृती समिति,डॉ.सुधान्शु गोरे,विवेक कुलकर्णी,सुमती कुलकर्णी डॉ.रविंद्र पारसनीस,विपाशा पारसनीस,सुनीता पारसनीस आदी मान्यवर उपस्थित होते.

रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहास संशोधक म्हणून ओळखले जातात .इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात त्यांचे स्थान वैशिष्ट्य पूर्ण आहे .महाराष्ट्रात साने , खरे, राजवाडे , वगैरे प्रारंभीच्या नामवंत व निष्ठावंत इतिहास संशोधकांनी मराठा इतिहास लेखनाची व ऐतिहासिक साधने संकलित व संपादित करण्याची जी थोर आणि उज्वल परंपरा निर्माण केली होती त्या परंपरेतील रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस हे एक इतिहास संशोधक , संपादक व संग्राहक होते. रावबहादूरांनी केलेले बहुताशी लेखन मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित आहे . त्यांनी अनेक पुस्तके प्रसिद्ध केली तसेच अनेक ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन - संपादन करून ती "भारत वर्ष " , " इतिहास संग्रह ", या मासिकातून प्रकाशित केली . झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र सर्व प्रथम रावबहादूर पारसनीस यांनी प्रसिद्ध केले .या ग्रंथाच्या लेखनास लोकमान्य टिळक यांचे प्रोत्साहन लाभले होते . स्वतः जमा केलेल्या कागद पत्रांचे जतन करण्यासाठी स्वतंत्र वस्तू संग्रहालयाची स्थापना करून ऐतिहासिक कागद पत्रे नवीन इतिहास संशोधकास उपलब्ध करून दिली.हे त्यांचे कार्य त्यांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते महाराष्ट्रातील काही व्यासंगी संशोधकांनी पारसनीसांच्या इतिहासविषयक लेखनाचा आणि संशोधन कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आढळतो.. तथापि रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांच्या चरित्राचा वेध घेणाऱ्या , त्यांच्या इतिहास साधनांचे संकलन , ऐतिहासिक कागदपत्रांचे संपादन आणि इतिहास संशोधनपर लेखन यांचे समग्र विवेचन करणाऱ्या ग्रंथाची उणीव होती , ती उणीव या पुस्तकाने भरून निघावी अशी अपेक्षा आहे. रावबहादूर पारसनीस यांचे नातू डॉ.सुरेन्द्र पारसनीस यांचे अध्यक्ष पदाखाली २०१७ मध्ये रावबहादूर पारसनीस स्मृती समिती स्थापन करण्यात आली होती तिच्या वतीने रा..पारसन .. रावबहादूर पारसनीस यांची जेष्ठ नात सुमती दत्तात्रेय कुलकर्णी यांच्या शुभहस्ते ' रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस चरित्र व कार्य " या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे ..कोरोना च्या साथी च्या काळात नियमांचे पालन करून पत्रकार भवनात निवडक पत्रकाराच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केला आहे.. डॉ सुरेन्द्र श्रीकृष्ण पारसनीस अध्यक्षरावबहादूर द..पारसनीस स्मृती समिती संपर्क - 9689098284 ---   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite