रोटरी पुणे पर्वती तर्फे पीपीई किटस आणि मास्कचे वाटप.
रोटरी मेट्रोच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगार व स्वयंरोजगार मेळावा
श्रीलंकन खुल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत स्मिता पाटील ई.एस.एस फौंडेशनच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
कॉन्टीनेन्टल प्रकाशनच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिध्द गायक संदीप खरे व डॉ.सलील कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
महेश सेवा संघाच्यावतीने पोलीस व अधिकारी यांना भोजन व नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी वाटप
पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सेनेच्या पुण्यातील काही जागा कमी झाल्याचा अर्थ अनेकांनी शिवसेना संपली असा घेतला. मात्र हाती आलेल्या आकडेवारीनुसार शिवसेनेची मते फक्त ०.८७% कमी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुलनेत अपक्ष व कॉंग्रेसला मोठा फटका बसलेला दिसतो. ही आकडेवारी श्री. शिरीष फडतरे यांनी जमा केली असून त्याचा आलेख सुद्धा www.peoplesmediapune.com या संकेत स्थळावर दर्शवण्यात आला आहे.
दिलीपराज प्रकाशनचे १९९९ वे पुस्तक (साहित्य लोक, ग्रामिण आणि दलीत), २००० वे पुस्तक (स्वातंत्र्य योद्धा - मार्टिन ल्युथर किंग) आणि २००१ वे पुस्तक ( दिल्याघरची मराठी ) यांचे प्रकाशन आणि पुणे शहरातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक प्रेस व प्रेसच्या इमारतीचे उदघाटन विरोधी पक्षनेते मा. विनोद तावडे यांच्या हस्ते होणार असून माजी गृहराज्यमंत्री मा.गजानन किर्तीकर, मा. आ. गिरीष बापट, मा. आ. भीमराव तापकीर आणि धायरीचे सरपंच मा.मदन भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. २००० व्या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक मा.द.मा. मिरासदार यांच्या हस्ते होणार असून प्रा.मिलींद जोशी या पुस्तकांवर आपले विचार मांडणार आहेत.
आयुष चिकित्सक महासंम्मेलन २०१
ONE DAY C.M.E. PROGRAMME ON CRITICAL ILLNESS BY FAMOUS AYUSH DOCTORS OF INDIA
दिनांक २७ नोव्हेंबर २०११ रोजी नाशिक येथे आयुष मेडीकल असोसिएशनने परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत महाराष्ट्रातील नामवंत आयुर्वेदी, होमिआपथी सिद्ध युनानी डॉक्टर, योग शिक्षक, निसर्गोपचार तज्ञ सहभागी होणार आहेत. या परिषदेत या क्षेत्रातील तज्ञांना येणा-या व्यावहारीक व कायदेशीर अड्चणी तसेच विकास व संशोधन समस्या यावर चर्चा होणार आहेत. तसेच दिनांक २६ नोव्हेंबर रोजी मधुमेह, सांधेदुखी, ह्रुदयविकार, कर्कविकार इत्यादी दुर्धर विकारांवर मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.
जाहिरात ही ग्राहकासाठी आहे, ग्राहकाच्या माहिती आणि गरजांच्या परिपूर्तीसाठी आहे तर त्या बद्दलची माहिती इंग्रजी बरोबरच प्रादेशिक भाषेत आणि इंटरनेटवर व्हावी आणि त्याचा फायदा तर असंख्य छोट्या व्यावसाईकांना व्हावा या हेतूने "जस्ट डिमांड" चे संचालक श्री विश्वजीत गिरीधारी यांनी http://justdemand.info या नावाचे वेब पोर्टल तयार केलेले आहे. व्यावसायिकांच्या अडचणी, मर्यादा आणि त्यांचे हित लक्षात घेतानाच अब्जावधी ग्राहकांना हव्या असणा-या वस्तू आणि सेवांच्या आणि खास करून प्रादेशिक भाषेत व्यक्त होऊ शकणा-या वैशिष्टांची दखल घेत या वेब पोर्टलची निर्मिती केलेली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका प्रवेशद्वाराजवळ आज (बुधवार) सकाळी सव्वादहाच्या सुमारास बाँब स्फोट झाला. या स्फोटात अकरा जण ठार असून चाळीसहून अधिकजण जखमी झाले आहेत.
या हल्ल्याची जवाबदारी पाकिस्तानातील हरकत - उल - जीहादी ने स्विकारली आहे.
’कर्तृत्ववान व्यक्तींचा समाजाने सन्मान करणे ही काळाची गरज’ प्रा. डॉ. सुधाकर जाधव
’समाजात विविध क्षेत्रात अनेक कर्तृत्ववान व्यक्ती या आपल्या असामान्य कर्तृत्वाने सामाजिक सेवेचे कार्य करीत असतात त्याची समाजाने दखल घेऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे ही काळाची गरज आहे’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुधाकर जाधव (डीन, कॉमर्स फॅकल्टी पुणे विद्यापीठ) यांनी केले. पाषाण सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने शिवाजीराव ज्ञानोबा निम्हण (असि.कमिशनर मुंबई पोलीस), रामदास राघोबा निम्हण (इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर पुणे), सुरेश रामचंद्र निम्हण (डेप्युटी मॅनेजर ऍडॉर पॉवरट्रॉन लि.) यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान झाल्यास त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते असे त्यांनी पुढे सांगितले, कार्यक्रमाचे संयोजन जयप्रकाश निम्हण यांनी केले. याप्रसंगी आ.विनायकरावजी निम्हण, ज्ञानेश्वर फडतरे (डी.सी.पी. झोन-२), वसंत जाधव (ए.सी.पी. मुंबई), तानाजीभाऊ निम्हण, प्रमोद निम्हण आदी मान्यवरांबरोबरच ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
शिवशक्ती भीमशक्ती मेळावा
© 2011. Peoples Media Pune